विठ्ठल नामी लागली समाधी

विठ्ठल विठ्ठल जयघोष कानी

टाळ, मृदुंग, चिपळ्या हि संगती

विठ्ठल विठ्ठल म्हणती सकळी

रंगला सोहळा विठ्ठल नामाचा भोवताली

दंगला मुकुंद ऐकता अभंगवाणी

नाचू किर्तनाचे संगी , ज्ञानदिप लावू जगी

तो हा विठ्ठल बरवा , तो हा माधव बरवा

ध्यानी विठ्ठलाची मूर्ती , मनी विठ्ठलाची भक्ती

हरवला वारकरी विठ्ठल प्रेमी

लोटला जनसागर विठ्ठल भेटि

अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग

विठ्ठल भेटिपायी चालली दिंडी

हाती पताका वैष्णवांची निशाणी

भेटि लागी जीवा विठ्ठल चरणी

अवघा रंगला सोहळा विठ्ठल भजनी

संत सज्जनांची दाटली मांदियाळी

विठ्ठल चरणी घाली लोटांगणी

विठ्ठल माझा भक्तीचा भुकेला

विठ्ठल माझा दिनांचा दयाळा

विठ्ठल माझा लेकुरवाळा , संगे संतांचा मेळा

करावा विठ्ठल , पहावा विठ्ठल

वंदावा विठ्ठल , जीवभावे

स्मरावा विठ्ठल , रहावा विठ्ठल

देखावा विठ्ठल , प्रेमभावे

विठ्ठल चित्ती , विठ्ठल मनी

विठ्ठल ध्यानी , विठ्ठल नामी

विठ्ठल विठ्ठल अवघी गर्जली पंढरी

विठ्ठल विठ्ठल दुमदुमली इंद्रायणी

माऊली माऊली विठ्ठल रूप तुझे

माऊली माऊली विठ्ठल नाम तुझे

विठ्ठल 🚩 विठ्ठल 🚩 विठ्ठल 🚩 विठ्ठल

विठ्ठल 🚩 विठ्ठल 🚩 विठ्ठल 🚩 विठ्ठल

जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

।। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय ।।