एक कविता
तुझ्या आठवणीत
स्फुरलेली 💕

एक कविता
तुझ्या सहवासात
रचलेली 💕

एक कविता
तुझ्या स्मरणात
स्मरलेली 💕

एक कविता
तुझ्या भेटित
उमललेली 💕

एक कविता
तुझ्या हसण्यात
खुललेली 💕

एक कविता
तुझ्या रंगात
रंगलेली 💕

एक कविता
तुझ्या विरहात
लिहिलेली 💕

एक कविता
तुझ्या नादात
नादावलेली 💕

एक कविता
तुझ्या नजरेत
सामावलेली 💕

एक कविता
तुझ्या स्पर्शात
सुखावलेली 💕

एक कविता
तुझ्या धुंदीत
धुंदलेली 💕

एक कविता
तुझ्या मोहात
मोहरलेली 💕

एक कविता
तुझ्या प्रेमात
वेडावलेली 💕

एक कविता
तुझ्या भक्तीत
गुंतलेली 💕

एक कविता
तुझ्या मनात
रूजलेली 💕

एक कविता
तुझ्या चरणांशी
विसावलेली 💕

एक कविता
तुझ्या संवादात
गुंफलेली 💕

एक कविता
तुझ्या प्रीतीत
लाजलेली 💕

एक कविता
तुझ्या ओढित
फुललेली 💕

एक कविता
तुझ्या क्षणांत
हरवलेली 💕

एक कविता
तुझ्या भावात
भारावलेली 💕

एक कविता
तुझ्या स्वप्नात
सजलेली 💕

एक कविता
तुझ्या पायांशी
वाहिलेली 💕

एक कविता
तुझ्या नात्यात
जपलेली 💕

एक कविता
तुझ्या शब्दांत
गुंतलेली 💕

एक कविता
तुझ्या ह्रदयात
ठसलेली 💕

एक कविता
तुझ्या चरणी
समर्पित 💕

– अमृता विनायक सोनवणे