कधी तू
रीम झिमणारी
बरसात 💕

कधी तू
बहरणारी
रातराणी 💕

कधी तू
उमलणारी
चाफेकळी 💕

कधी तू
बरसणारी
श्रावण धारा 💕

कधी तू
भारावलेली
मधुमती 💕

कधी तू
सजलेली
चांदरात 💕

कधी तू
दरवळणारी
कस्तुरी 💕

कधी तू
कोसळणारी
हिमवर्षा 💕

कधी तू
हसणारी
चंद्रकला 💕

कधी तू
रेखाटलेली
प्रतिमा 💕

कधी तू
बोलणारी
अबोली 💕

कधी तू
भुलवणारी
नायिका 💕

कधी तू
नटलेली
लावण्या 💕

कधी तू
चम चमणारी
चांदणी 💕

कधी तू
मंतरलेली
शलाका 💕

कधी तू
खुलणारी
प्राजक्ता 💕

कधी तू
रंगवलेली
चित्ररेखा 💕

कधी तू
भिजलेली
पल्लवी 💕

कधी तू
झुरणारी
प्रेमिका 💕

कधी तू
गुंफलेली
कविता 💕

कधी तू
स्फुरलेली
कल्पना 💕

कधी तू
बावरलेली
प्रियतमा 💕

कधी तू
मोहरणारी
लतिका 💕

कधी तू
हरवलेली
राधिका 💕

कधी तू
गहिवरलेली
भावना 💕

कधी तू
लिहिलेली
रचना 💕

कधी तू
फुलणारी
समिक्षा 💕

कधी तू
लाजणारी
लाजिरी 💕

कधी तू
धुंदलेली
दमयंती 💕

कधी तू
लुभावणारी
मोहिनी 💕

कधी तू
रंगलेली
गायिका 💕

कधी तू
आठवणारी
स्मृती 💕

कधी तू
भाळलेली
शालिनी 💕

कधी तू
गुंतणारी
मनिषा 💕

कधी तू
सुखावणारी
शितलता 💕

कधी तू
सळ सळणारी
बिजली 💕

कधी तू
झर झरणारी
सरीता 💕

– अमृता विनायक सोनवणे

PS 💕 Please don’t throw tomato’s on me ☺️😉😁😋😊😘❤️

Pay Anything You Like

Amruta

Avatar of amruta
$

Total Amount: $0.00