तुझे माझे प्रेम
तुझ्या सहवासात
फुललेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या आठवणीत
रमलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या कार्यात
गुंतलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या भजनात
दंगलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या स्मरणात
स्मरलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या भेटित
उमललेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या रंगात
रंगलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या हास्यात
खुललेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या विरहात
हरवलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या नजरेत
सामावलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या मोहात
अडकलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या क्षणांत
विसावलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या भावात
चिंतलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या स्वप्नात
सजलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या किर्तनात
आळवलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या प्रेमात
ओथंबलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या ह्रदयात
ठसलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या पूजनात
रूढावलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या नामात
गहिवरलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या स्तुतीत
हरखलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या भावात
दाटलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या स्तवनात
स्फुरलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या ध्यानात
भारावलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या भक्तीत
दृढावलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या चरणांशी
स्थिरावलेले 💕
तुझे माझे प्रेम
तुझ्या स्वरूपात
एकवटलेले 💕
– अमृता विनायक सोनवणे
Comments & Discussion
18 comments on this post. Please login to view member comments and participate in the discussion.