बरसू दे आज मेघ इतूके
भाव मनीचे चिंब भिजू दे

बोलू दे मला आज इतूके
शब्द ह्रदयी चे ओठी उठू दे

पाहू दे मज आज तुझ्या कडे
नजरेत तुझ्या नजर गुंतूनी

रडू दे मला आज इतूके
अश्रू नयनीचे ना थांबावे

गाऊ दे मज गीत तुझ्या सवे ❤️
बोल अंतरीचे कानी घुमू दे

लागू दे मज वेड तुझे इतूके
हरवू दे मम भान या जगीचे

होऊ दे मनं आज बेभान इतूके
आक्रोश ह्दयीचा उरी फुटू दे

विरू दे आज बांध भावनांचा
वाहू दे लोचनी पूर आसवांचा

बरसू दे आज मेघ इतूके
भाव मनीचे चिंब भिजू दे

~ अमृता 💕

Pay Anything You Like

αmruta

$

Total Amount: $0.00