मला वाटते
तुझे नाम चित्ती
स्मरावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे गीत ओठी
म्हणावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझ्या चरणीं
रडावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे नित्य स्तवन
करावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे लीलाचरित्र
वर्णावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे स्वप्न नयनी
पहावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझ्या भजनी
रंगावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझ्या आठवणीत
गुंतावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे रूप ह्रदयी
चिंतावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे भाव
न्याहाळावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे बोल कानी
ऐकावे 💕
स्वामी

मला वाटते
मी स्वतः ला
हरवावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे चरण मनी
वंदावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे शब्द ओठी
यावेत 💕
स्वामी

मला वाटते
तुझे प्रेम अंतरी
दाटावे 💕
स्वामी

मला वाटते
मी मजला
विसरावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझ्या हास्यात
रमावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझ्या भक्तीत
दंगावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझे ध्यान
लागावे 💕
स्वामी

मला वाटते
तुला स्मरणी
आळवावे 💕
स्वामी

मला वाटते
तुझ्या साठी
झुरावे 💕
स्वामी

मला वाटते
तुला निरंतर
भजावे 💕
स्वामी

मला वाटते
तुला नव्याने
आठवावे 💕
स्वामी

– अमृता विनायक सोनवणे

Pay Anything You Like

Amruta

Avatar of amruta
$

Total Amount: $0.00