स्वामी तुझ्या भेटिचं बोलावणं सांग मला धाडशील कवा ?
स्वामी तुझ्या दर्शनाची मला लागली तहान, मला लागली तहान
स्वामी तुझ्या आठवणीत मन झालया हे येडं, मन झालया हे येडं
नाथा तुझ्या चरणांची धूळ आता सांग मला लावशिल कवा ?
देवा तुझ्या कृपेचा प्रसाद आता सांग मला देशील कवा ?
स्वामी नाथा रं….. स्वामी नाथा रं…..
सांग मला भेटशील कवा ? देवा सांग मला भेटशील कवा ?
तुझ्या कृपेच्या छायेत मला नाथा सांग आता घेशील कवा ?
गावातले सगळे जाऊनशी आयले….गावातले सगळे जाऊनशी आयले….
तुला रं देवा भेटुनशी आयले….तुला रं देवा भेटुनशी आयले…
मीच कशी राहिले मागं ? सांग मीच कशी राहिले मागं ?
आन् तुझ्या देवळाची वाट मला सांग रं दावशिल कवा ?
देवा तुझ्या देवळाची वाट मला सांग रं दावशिल कवा ?
स्वामी नाथा रं….. स्वामी नाथा रं…..
मला दर्शन देशील कवा ? बाबा दर्शन देशील कवा ?
स्वामी तुझ्या नावाचा गजर देवा सांग किती करू आता ?
माझी आई आणि बाप तुच विठ्ठल रखुमाई…. तुच विठ्ठल रखुमाई….
तुझ्या पायी देवा मी रं वाहिन माझी पुण्याई….वाहिन माझी पुण्याई….
किती जन्म आता घेऊ ? किती वाट तुझी पाहू ?
स्वामी माझ्या प्रश्नांची उत्तरं मला सांग तू देशील कवा ? देवा सांग तू देशील कवा ?
आरं सांग तू देशील कवा ??

Pay Anything You Like

vinayaksonawane50@gmail.com

$

Total Amount: $0.00