आनंदाची अनुभूती
स्वामी माझा 💕

योग्यांची समाधी
स्वामी माझा 💕

सृष्टीचा पालनहार
स्वामी माझा 💕

जीवांचा तारणहार
स्वामी माझा 💕

नव भक्तीचे आगर
स्वामी माझा 💕

जन मुक्‍तीचे माहेर
स्वामी माझा 💕

भक्तांचा पाठिराखा
स्वामी माझा 💕

दिनांचा सौख्यदाता
स्वामी माझा 💕

पतितांचा पावनकर्ता
स्वामी माझा 💕

सकलांचा रक्षणकर्ता
स्वामी माझा 💕

त्रिभुवनाचा धाता
स्वामी माझा 💕

चिरसुखाचा दाता
स्वामी माझा 💕

दुर्जनांचा मारक
स्वामी माझा 💕

सज्जनांचा तारक
स्वामी माझा 💕

स्वानंदाचा बोध
स्वामी माझा 💕

ब्रम्हानंदाचा शोध
स्वामी माझा 💕

जगाची माऊली
स्वामी माझा 💕

कृपेची साऊली
स्वामी माझा 💕

सर्व कार्याचा कर्ता
स्वामी माझा 💕

सर्व संकटांचा हर्ता
स्वामी माझा 💕

चारी वेदांचा सार
स्वामी माझा 💕

भव दुःखाच्या पार
स्वामी माझा 💕

श्रध्देचा विसावा
स्वामी माझा 💕

प्रेमाचा ओलावा
स्वामी माझा 💕

त्राता प्रभू सकलांचा
स्वामी माझा 💕

दृढ भाव निरंतरचा
स्वामी माझा 💕

विश्वाचा सूत्रधार
स्वामी माझा 💕

धर्माचा प्रसारक
स्वामी माझा 💕

आईची माया
स्वामी माझा 💕

ममतेची छाया
स्वामी माझा 💕

आश्रितांचा आसरा
स्वामी माझा 💕

पामरांचा भरवसा
स्वामी माझा 💕

सत्यातला शिवसुंदर
स्वामी माझा 💕

ओंकाराचे पूर्ण रूप
स्वामी माझा 💕

– अमृता विनायक सोनवणे