स्वामी
भक्तांच्या हाकेला सत्वर
धावतोस तू 💕

स्वामी
मनी भक्तीची तार
छेडतोस तू 💕

स्वामी
अंतरीची ज्योती
तेवतोस तू 💕

स्वामी
श्रमिकांसवे शेतात
राबतोस तू 💕

स्वामी
प्रसंगी नियतीचे घाव
सोसतोस तू 💕

स्वामी
होवूनी तल्लीन किर्तनी
नाचतोस तू 💕

स्वामी
गाताना श्रीहरी भजनी
रंगतोस तू 💕

स्वामी
सर्वांच्या ह्रदय मंदिरी
वसतोस तू 💕

स्वामी
तुझ्या भक्तांचे हित
करतोस तू 💕

स्वामी
रंजले गांजल्यांना आपुले
म्हणतोस तू 💕

स्वामी
भक्तीच्या नाना लीला 
दावतोस तू 💕

स्वामी
मनी श्रध्देची ठिणगी
जागवतोस तू 💕

स्वामी
भक्तांच्या भक्तीला
भुलतोस तू 💕

स्वामी
पाहोनी भक्तांचा लळा
रमतोस तू 💕

स्वामी
ज्ञानेश्वराचे ज्ञानी बोल
बोलतोस तू 💕

स्वामी
परमेश्वराची नाना रूपे
सजवतोस तू 💕

स्वामी
शरणागतांना आश्रय
देतोस तू 💕

स्वामी
सकल भाविकांना
तारतोस तू 💕

स्वामी
कठिण भव सागरातून
उध्दारतोस तू 💕

स्वामी
तुझ्या भजनात आनंदाने
डुलतोस तू 💕

स्वामी
दुर्गुणांचा भार दूर
सारतोस तू 💕

स्वामी
सर्वदा ध्यानात मग्न
दिसतोस तू 💕

स्वामी
मोह मायेच्या पाशातून
सोडवतोस तू 💕

स्वामी
ज्याचा जसा भाव तसा
पावतोस तू 💕

स्वामी
मला तर साक्षात ईश्वर
भासतोस तू 💕

– अमृता विनायक सोनवणे