शब्दातून नि:शब्दाकडे
साधणारा संवाद तू 🍁

स्थूलतेतून सूक्ष्मतेकडे
वहाणारी जाणीव तू 🍁

व्यक्तातून अव्यक्ताकडे
पोहोचवणारा प्रवास तू 🍁

ॐ कार चैतन्याची
सगुण निर्गुण दोन रूपे तू 🍁

भक्ति – कर्म – ज्ञान तीन
योगांचे अपूर्व मिलन तू 🍁

नरातून नारायणाकडे
नेणारी उपासना तू 🍁

परमशुद्ध स्वत्वाचा अनुभव
देणारी अनुभूती तू 🍁

जीव आणि शिवशक्ती
साधनेतील दुवा तू 🍁

अज्ञानातून ज्ञानाकडे
जाणारा प्रकाश तू 🍁

दुर्भाग्यातून सद्भाग्याकडे
नेणारा सच्चिदानंद तू 🍁

द्वैतातून अद्वैताकडे
जाणवणारे परमतत्व तू 🍁

तिमिरातून तेजाकडे
पसरणारे वलय तू 🍁

कल्पनेतून वास्तवाकडे
जाणारी पायवाट तू 🍁

बंधनातून मुक्तीकडे
नेणारी चैतन्याची उर्जा तू 🍁

असंख्यातून शून्याकडे
जाणवणारी स्पंदने तू 🍁

पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे
नेणारे दैवी सामर्थ्य तू 🍁

दुःखातून शाश्वत आनंदाकडे
वहाणारी संवेदना तू 🍁

असत्यातून सत्याकडे
दर्शवणारा दृढ संकल्प तू 🍁

अशांतीतून शांततेकडे
वळवणारा वळसा तू 🍁

अस्थिरतेतून स्थिरतेकडे
नेणारा निश्चल मार्ग तू 🍁

मोह मायेतून मोक्षाकडे
पोहचवणारा उध्दारक तू 🍁

आसक्तीतून निर्वाणाकडे
नेणारा परमपिता तू 🍁

सर्वांच्या ह्रदयी तेवणारी
आत्मज्योत तू 🍁

निर्गुण निराकार
परब्रम्हाचे स्वरूप तू 🍁

***********************************

हिंदी भाषांतर

शब्द से निःशब्द कि ओर

स्थूलता से सूक्ष्मता कि ओर

व्यक्त से अव्यक्त कि ओर

नर से नारायण कि ओर

अज्ञान से ज्ञान कि ओर

दुर्भाग्य से सद्भाग्य कि ओर

द्वैत से अद्वैत कि ओर

अंधेरे से प्रकाश कि ओर

कल्पना से वास्तव कि ओर

बंधन से मुक्ती कि ओर

असंख्य से शून्य कि ओर

पारतंत्रता से स्वतंत्रता कि ओर

दुःख से शाश्वत आनंद कि ओर

असत्य से सत्य कि ओर

अशांती से शांती कि ओर

अस्थिरता से स्थिरता कि ओर

मोह से मोक्ष कि ओर

आसक्ती से निर्वाणा कि ओर

सब के ह्रदय में जल रहि आत्मज्योत

निर्गुण निराकार परब्रह्म का स्वरूप

ओम स्वामीजी 🙏🙏

All glories to you swamiji 🙇🙇🙇🙇🙇

Pay Anything You Like

Amruta

Avatar of amruta
$

Total Amount: $0.00