तू अज्ञानाचा अंधार दूर कर आणि ज्ञानाचा प्रकाश दाखव

Remove the darkness of ignorance and show the light of knowledge .

तू सद्बुद्धी दे , तू तेज दे
तू आनंद दे , तू विश्वास दे
तू प्रेम दे , तू वात्सल्य दे
तू भक्ती दे , तू चैतन्य दे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

तू दुर्गुणांचा नाश कर आणि दैवी सद्गुणांची वाढ कर

Destroy the vices and increase the divine virtues .

तू आधार दे , तू साथ दे
तू शांती दे , तू स्थैर्य दे
तू शक्ती दे , तू सद्भाग्य दे
तू ऊर्जा दे , तू श्रद्धा दे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

तू मनाची मालिन्यता दूर कर आणि आत्मविश्वास जागव

You get rid of the filth of the mind and awaken confidence .

तू प्रेम दे , तू करूणा दे
तू क्षमा दे , तू  शक्ती दे
तू चेतना दे , तू  निष्ठा दे
तू सुख दे , तू प्रेरणा दे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

तू मोहाच्या बंधनातून मुक्त कर आणि सत्याचे दर्शन घडव

Free myself from the bondage of temptation and manifest the truth .

तू किर्ती दे , तू नम्रता दे
तू मुक्ती दे , तू समाधान दे
तू सद्भावना दे , तू कृपा दे
तू कृतज्ञता दे , तू बोध दे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

तू नकारात्मक भाव दूर कर आणि सकारात्मक भाव वाढव

You get rid of negativity and increase positivity .

तू दृढता दे , तू अभय दे
तू जाणीव दे , तू भाव दे
तू सद्विचार दे , तू संधी दे
तू संवेदना दे , तू प्रज्ञा दे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

तू जीवनातील अस्थिरता दूर कर आणि स्थिरता प्रदान कर

You remove the instability in life and provide stability .

तू जागृती दे , तू समृध्दी दे
तू सत्संगती दे , तू यश दे
तू संपन्नता दे , तू स्नेह दे
तू एकाग्रता दे , तू मेधा दे

तू भवदुःख दूर कर आणि शाश्वत सुखाची प्राप्ती करून दे

Take away all sorrows and give me eternal bliss . 

🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇