At that time when I am alone walking on huge road where passer by is here nd there, lots of screeches of vehicles, lots of sounds but still I am alone. रिक्त पोकळी कदाचित यावेळेसाठी तरी कधीच भरून न निघणारी. जगण्याचा अर्थ शोधायला सुद्धा अर्थ असावा लागतो अशी जाणीव देणारी एक भक्कास पोकळी. नसलेल्या जगण्यातल असलेल पण तहानलेल्या चातका सारख शोधायला लावणारी. मी इतकं दुःखी का असावं, याच उत्तर अनुत्तरित. हात लावावा आणि बहरलेल फुल करपून जावं अशी स्तिथी. हृदयात होणारी प्रचंड वेदना असह्य तितकीच थंड गारठलेल्या बाभळी सारखी. Where I really want to run from this world, from this pain. सुकलेली प्रत्येक गाठ, रखरखीत पणामुळे सुटेल अशा स्तिथीत आलेली. जो ओलावा आणलाय मी तो ही उधारीतला. आपल्या बागेत असताना ही तुमच फुलून येन नैसर्गिक नसेल तर तुमच्या इतके कमनशिबी तुम्हीच. तरी ही आयुष्यात स्वतःला फुलता नाही आलं तरी कोणाचे मार्गस्थ व्हावं, कोणाला तरी फुलण्यास वाव द्यावा, शब्द द्यावेत, ऊब द्यावी वेळ पडली तर स्वतः सरी बनून बरसावे. कदाचित हाच रस्ता असेल माझ्यासाठी माझ्या अनंत दुःखाला वाट करून देण्यासाठी. In other words, what you really want in your life you should become source of it to others, maybe it can help to find your piece.
– Ashwini Patil

Pay Anything You Like

Ashwini Patil

Avatar of ashwini patil
$

Total Amount: $0.00