माझ्या स्वामीजींचे गुण मला गाऊ द्या
चरणी पुष्प हे वाहू द्या….
बहुत कष्ट केले असतील म्हणूनी मिळाला हा मानवजन्म
काही पुण्य केले असतील म्हणूनी मिळाले हे स्वामीचरण
या जन्माचे करण्या सार्थक रूप त्यांचे पाहू द्या
हाक मारीता धावत येतो संकटे सारी घेऊनी जातो
आई म्हणू की बाप तुम्हा मी कासावीस जीव तुजविण होतो
तोडी नाते मोहमायेचे स्वामी भजनी न्हाऊ द्या
पुर्ण होता आस मनाची दर्शन करील मी तव चरणांचे
माळा वाहुनी दिपसुमनांची ज्योती वाहीन या आसवांची
भावनेचा पूर स्वामी सदैव चरणी वाहू द्या…..

Pay Anything You Like

vinayaksonawane50@gmail.com

$

Total Amount: $0.00