तुझे माझे नाते
हळूवार फिरणाऱ्या
मोरपिसासारखे 💕

तुझे माझे नाते
संथ वहाणाऱ्या
नदिसारखे 💕

तुझे माझे नाते
सुगंधित दरवळणाऱ्या
अत्तरासारखे 💕

तुझे माझे नाते
श्रावणात रीमझिमणाऱ्या
सरींसारखे 💕

तुझे माझे नाते
मंद पसरणाऱ्या
वाऱ्यासारखे 💕

तुझे माझे नाते
अलगद उमलणाऱ्या
कळीसारखे 💕

तुझे माझे नाते
गालावर खुलणाऱ्या
खळीसारखे 💕

तुझे माझे नाते
हातावर रंगणाऱ्या
मेहंदिसारखे 💕

तुझे माझे नाते
कवितेत गुंफलेल्या
शब्दांसारखे 💕

तुझे माझे नाते
वेलीवर झुलणाऱ्या
फुलासारखे 💕

तुझे माझे नाते
एकांतात मंतरलेल्या
क्षणांसारखे 💕

तुझे माझे नाते
पावसात भिजणाऱ्या
पालवीसारखे 💕

तुझे माझे नाते
सुखद हरवलेल्या
आठवणींसारखे 💕

तुझे माझे नाते
ओठावर गुणगुणणाऱ्या
गीतासारखे 💕

तुझे माझे नाते
अंगणी मोहरणाऱ्या
प्राजक्तासारखे 💕

तुझे माझे नाते
एकमेकांत गुंतलेल्या
भावनांसारखे 💕

तुझे माझे नाते
पहाटे पडणाऱ्या
स्वप्नासारखे 💕

तुझे माझे नाते
आकाशात चमकणाऱ्या
ताऱ्यांसारखे 💕

तुझे माझे नाते
धुक्यात हरवलेल्या
सौंदर्यासारखे 💕

तुझे माझे नाते
विरहात झुरणाऱ्या
पक्षांंसारखे 💕

तुझे माझे नाते
रात्री बहरणाऱ्या
रातराणीसारखे 💕

तुझे माझे नाते
पानावर ओथंबणाऱ्या
दवबिंदूसारखे 💕

– अमृता विनायक सोनवणे