दत्त पाळणा झुलविते गं , दत्त पाळणा झुलविते
दत्त बाळाला निजविते गं , दत्त बाळाला निजविते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दत्त चरणी लागले ध्यान माझे , दत्त चरणी ध्यान
दत्त नामी लागली समाधी माझी , दत्त नामी समाधी
दत्त भजनी रंगले मनं माझे , दत्त भजनी मनं
दत्त चिंतनी हरवले चित्त माझे , दत्त चिंतनी चित्त

दत्त पाळणा झुलविते गं , दत्त पाळणा झुलविते
दत्त बाळाला निजविते गं , दत्त बाळाला निजविते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दत्त प्रेमात नहाते मी , दत्त प्रेमात नहाते
दत्त दर्शनाची लागली तहान मला , दत्त दर्शनाची तहान
दत्त परंपरेची साथ मला , दत्त परंपरेची साथ
दत्त भेटिची ओढ मजला , दत्त भेटिची ओढ

दत्त पाळणा झुलविते गं , दत्त पाळणा झुलविते
दत्त बाळाला निजविते गं , दत्त बाळाला निजविते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दत्त दिगंबर दैवत माझे , दत्त दिगंबर दैवत
दत्त कृपेची छाया जीवनी माझ्या , दत्त कृपेची छाया
दत्त प्रभूंचे रूप पहाते मी , दत्त प्रभूंचे रूप
दत्त जयंतीचा सोहळा हा , दत्त जयंतीचा सोहळा

दत्त पाळणा झुलविते गं , दत्त पाळणा झुलविते
दत्त बाळाला निजविते गं , दत्त बाळाला निजविते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दत्त भक्तीत दंगते मी , दत्त भक्तीत दंगते
दत्त रूप डोळ्यांत साठविते मी , दत्त रूप साठविते
दत्त प्रभूंचे गुणगान गाते मी , दत्त प्रभूंचे गुणगान
दत्त कार्यात गुंतले मी , दत्त कार्यात गुंतले

दत्त पाळणा झुलविते गं , दत्त पाळणा झुलविते
दत्त बाळाला निजविते गं , दत्त बाळाला निजविते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

दत्त सेवेत समाधान माझे , दत्त सेवेत समाधान
दत्त पादुकांची पडली भुरळ मजला , दत्त पादुकांची भुरळ
दत्त वारीचे लागले वेड मजला , दत्त वारीचे वेड
दत्त गुरूंच्या चरणी लोटांगण माझे , दत्त गुरूंच्या चरणी

दत्त पाळणा झुलविते गं , दत्त पाळणा झुलविते
दत्त बाळाला निजविते गं , दत्त बाळाला निजविते

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Pay Anything You Like

Amruta

Avatar of amruta
$

Total Amount: $0.00