स्वामी तुझी प्रीत
मनाच्या कोपऱ्यात
विसावणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
ह्रदयाच्या गाभाऱ्यात
तेवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
अंतरी खोलवर
पाझरणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
भक्ती रसात
रंगणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
मोहाच्या पाशातून
सोडवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
जन्म मरणाचा
फेरा चुकवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
सत्याचे दर्शन
करवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
मोक्षाचा मार्ग
दाखविणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
आत्म साक्षात्कार
घडवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
करूणेने उध्दारून
नेणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
शाश्वत आनंद
देणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
आत्म स्वरूप
चिंतणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
वास्तवाचे भान
दर्शवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
जीवनभर साथ
निभावणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
भक्तीची कास
धरणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
अज्ञानाचा अंधकार
हटवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
अध्यात्माचे अमृत
पाजणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
ज्ञानाचे अंजन
घालणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
ईश्वराचे प्रतिबिंब
दावणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
श्रीहरीचे गुण
वर्णनारी 💕

स्वामी तुझी प्रीत
अद्वैत भाव
जागवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
विश्वाचे गूढ
उलगडणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
प्रत्येक क्षणी
आठवणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
दिवसें दिवस
बहरणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
काळजात खोल
रूजणारी 💕

स्वामी तुझी प्रीत
माझ्या मनाला
भुलवणारी 💕

– अमृता विनायक सोनवणे